ATM : एटीएमवरील मोफत व्यवहारांना मर्यादा

केंद्र सरकारने देशभरात कॅशलेस इकोनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेळ्या पद्धतींचा अवलंब केला असून त्यासाठी बँकेच्या1 मार्चपासून काही नियमांमध्ये बदल होणार आहे.
  • एचडीएफसी बँक : 4 वेळा पैसे काढल्यानंतर त्यावर कोणताही चार्ज नाही लागणार. त्यानंतर प्रत्येक ट्रांजेक्शनवर 150 रुपये सर्विस चार्ज लागेल. होम ब्रांचमधून प्रत्येक महिन्याला एका अकाऊंटमधून 2 लाखापर्यंतच पैसे देवानघेवान करु शकता. त्याच्यावर प्रत्येकी हजार रुपयांवर 5 रुपयाप्रमाणे कमीतकमी 150 रुपये चार्ज लागेल. दुसऱ्या ब्रांचमधून रोज 25 हजारापर्यंत ट्रांजेक्शन फ्री असणार आहे. सीनियर सिटिजन आणि 18 वर्षाखालील मुलांच्या अकाउंटवर कोणतेही चार्ज नाही लागणार.
  • अॅक्सिस बँक: 1 लाखांच्या वरील ट्रान्सजेक्शनवर प्रत्येकी हजार रुपयांवर 5 रुपये प्रमाणे चार्ज लागेल. 5 व्या ट्रांजेक्शनवर 150 किंवा हजार रुपयावर 5 रुपये अशा प्रकारे चार्ज लागेल.
  • आयसीआयसीआय बँक : होम ब्रँचमध्ये 4 पेक्षा अधिक ट्रांजेक्शनवर कमीत कमी 150 रुपये चार्ज लागेल.
  • एटीएमवर पुन्हा लागणार चार्ज: आता एटीएममधून कॅश काढण्यासाठी 10,000 रुपयांची मर्यादा आहे तर आठवड्याला 50 हजार रुपयांपर्यंतची मर्यादा आहे.