रामदास आठवलेंनी उधळली शरद पवारांवर स्तुतिसुमने तर राहुल गांधीना काढला चिमटा

मुंबई : शरद पवार हे देशातील ज्येष्ट अनुभवी नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे राहुल गांधींचे पितळ उघडे पडले आहे. राहुल गांधी हे सतत प्रधानमंत्री मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असतात असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी लगावला आहे. ते मुंबईत बोलत होते.

नेमकं काय म्हणाले आठवले ?

राफेल करार हे दोन देशातील करार होता. हे फ्रान्सच्या अध्यक्षांनी जाहीर केले असल्याने प्रधानमंत्री मोदींना राहुल गांधी नाहक बदनाम करीत आहेत. मात्र शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मोदींना क्लीन चिट दिल्याने राहुल गांधी उघडे पडले आहेत.आपला मुद्दा मांडताना सरकारवर आरोप करताना सरकारशी समंजस आणि सहकाराची सुद्धा भूमिका विरोधी पक्षाने घेतली पाहिजे. ही लोकशाही व्यवस्थेतील उच्च मूल्यांची शिकवण शरद पवारांनी विरोधकांना दाखवून दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी तारिक अन्वर यांना विचारला ‘हा’ मार्मिक सवाल

राष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा – पवार