गुजरात, हिमाचलचा विजय नरेंद्र मोदींचा -आठवले

आठवले

नागपूर : गुजरात, हिमाचल मध्ये एनडीएचा झालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असून यंदाचा निवडणुकीत दलितांची मते मोठ्या प्रमाणात भाजप उमेदवारांना मिळाल्याने विजय सुकर झाल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

 नरेंद्र मोदी हे दलित समाजाला,संविधानाला, आरक्षणाला मानणारे असून अनेक कार्य दलित समाजासाठी करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कितीही विरोधक एकत्र आले तरी देशाची जनता मोदी सोबत असल्याचे निवडणुकीतून दिसत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.