PHOTOS : अय्या…किती गोड! अथिया शेट्टीनं बॉयफ्रेंड केएल राहुलला केलं ‘अशा’ प्रकारे बर्थडे विश; तुम्हीच पाहा!
मुंबई : लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आज (१८ एप्रिल) आपला ३०वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या क्रिकेटव्यतिरिक्त कर्णधार केएल राहुल त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अथिया शेट्टीबद्दलही (Athiya Shetty) चर्चेत आहे. अथिया आणि राहुल काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा दोघेही एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करत असतात. राहुलच्या वाढदिवसानिमित्त अथियावने एक खास पोस्ट लिहिली आहे.
अथियाने तिच्या इंस्टाग्रामवर केएल राहुलसोबतचे तीन फोटो पोस्ट केले आहेत. ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. पहिल्या फोटोमध्ये तिने राहुलला मिठी मारली आहे. दुसऱ्या फोटोत दोघेही एकमेकांचा हात धरून जंगलात फिरताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये ती राहुलसोबत सेल्फी घेताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/Cce2L6QBVrf/
या फोटोसह तिने एक गोड कॅप्शन लिहिले आहे. ”तू जिथे जाशील तिथे तुझ्यासोबत, वाढदिवसाच्या शुभेच्छा.” या फोटोंवर भरपूर लाइक्स येत आहेत. याला उत्तर देताना केएल राहुलनेही लिहिले, ‘लव्ह यू.’ . अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे, की केएल राहुल आणि अथिया शेट्टीची ओळख त्यांच्या एका मित्राने केली होती.
केएल राहुलचे सुनील शेट्टीच्या कुटुंबासोबत चांगले बाँडिंग पाहायला मिळत आहे. शनिवारी राहुलने मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध आयपीएलमधील १००वा सामना खेळला. या सामन्यात त्याने शतक झळकावत आपल्या नेतृत्वाखालील लखनऊ संघालाही विजय मिळवून दिला.
२०२१मध्ये अथिया शेट्टीच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी क्रिकेटर केएल राहुलने अखेर इंस्टाग्रामवर त्यांचे नाते सर्वांसमोर आणले. राहुलने रोमँटिक कॅप्शनसह दोघांचे फोटो शेअर केले आहेत. राहुल आणि अथियाचा एकत्र फोटो पाहिल्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे चाहत्यांना कळले. त्यांच्या नात्याची अफवा आधीपासूनच होती, मात्र राहुलच्या या पोस्टनंतर हे नाते जगजाहीर झाले.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com