Ather Electric Scooter | टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशामध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक (Electric) वाहनांची क्रेझ वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक वाहक उत्पादक कंपन्या बाजारामध्ये उत्कृष्ट फीचर्ससह नवीन इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) लाँच करत आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी Ather नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार असल्याची माहिती मिळाली आहे. कंपनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 7 जानेवारी 2023 रोजी लाँच करू शकते.
मीडिया रिपोर्टनुसार, Ather चे नवीन मॉडेल मॅक्सी इलेक्ट्रिक स्कूटर असू शकते. या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.5 ते 3kWh बॅटरी पॅक उपलब्ध असू शकतो. ही स्कूटर एका चार्जवर सुमारे 100 किमी पर्यंत धावू शकेल. या स्कूटरचे आधी बाजारात उपलब्ध असलेले मॉडेल 450X Gen 3 अधिक शक्तिशाली बॅटरी पॅकसह येते. 450X Gen 3 मध्ये 3.7kWh बॅटरी पॅक उपलब्ध आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बजेट फ्रेंडली असू शकते. या स्कूटरची किंमत 80 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत असू शकते. ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 आणि S1 इलेक्ट्रिक स्कूटर सोबत स्पर्धा करेल.
Ather च्या या इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी आधी सुरू झाली आहे. चाचणीदरम्यान या स्कूटरच्या डिजाइनबद्दल माहिती मिळाली आहे. या स्कूटरमध्ये टचस्क्रीन डिस्प्ले, ओटीए अपडेट्स आणि नेव्हिगेशन यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असू शकतात.
काही दिवसांपूर्वी Ola ने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर S1 एअर लाँच केली होती. आता Ola च्या पाठोपाठ Ather सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर 7 जानेवारी रोजी लाँच करू शकते.
महत्वाच्या बातम्या
- Skin Care Tips | ‘या’ बियांच्या वापराने चेहरा राहू शकतो निरोगी, जाऊन घ्या पद्धत
- Hyundai Creta Facelift | ‘या’ बदलांसह एप्रिल 2023 पर्यंत लाँच होऊ शकते Hyundai Creta Facelift
- Rishabh Pant Accident | ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशी रौतेलाने केली पोस्ट, म्हणाली…
- Rishabh Pant Accident | आईला भेटायला निघाला ऋषभ पंत, अन् मधेच…
- Best Mileage Car | 2022 मधील ‘या’ आहेत सर्वोत्कृष्ट मायलेज देणाऱ्या कार