नाक मुरडणाऱ्या समाजाला आता आरक्षण मागण्याची वेळ आली आहे- आठवले

ramdas aathvale

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी केल्यानंतर रामदास आठवले यांनी सुद्धा सवर्णांना क्रिमिलेयरची अट घालून सवर्णांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. कधीकाळी आरक्षणाच्या नावाने नाक मुरडणाऱ्या समाजाला आता आरक्षण मागण्याची वेळ आली आहे असे म्हणत आर्थिक निकषावर क्रिमिलेयरची अट घालून सवर्णांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केली.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार,आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांऐवजी ७५ टक्क्यांपर्यंत वाढवावी, जेणेकरून आरक्षणावरून समाजात निर्माण झालेली तेढ संपेल, असा दावाही आठवले यांनी केला. सवर्णांना आर्थिक निकषावर आरक्षण देतानाच दलित आणि ओबीसींचे आरक्षण कायम राहावे, अशी आपली भूमिका असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.