मंत्रिपद मिळाल्यापासून दलित अत्याचाराच्या घटनांवर आठवले गप्प

रामदास आठवले

मुंबई: केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले मंत्रिपद मिळाल तेव्हापासून गप्प आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दलित अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मात्र आठवले अत्याचाराच्या घटनांबाबत मौन बाळगून आहेत. त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली.

मुंबईत काँग्रेसतर्फे सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. परिणामी दलित समाजाच्या मनात त्यांच्याविषयी रोष उत्त्पन्न झाला आहे. त्यामुळे आठवलेंनी मंत्रिपदावरून पायउतार व्हावे, असे निरूपम यांनी म्हटले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा आज राजघाटवर दलितांच्या समर्थनार्थ एकदिवसीय उपोषण करणार आहेत. २ एप्रिलला दलितांनी पुकारलेला भारत बंद आणि त्यांच्यावरील कथित अत्याचाराविरोधात राहुल गांधी उपोषण करणार आहेत.