राज्यात ‘या’ उमेदवारांना वंचितचा पाठींबा, बार्शीत अपक्ष काकडेंना वंचितची ताकद

टीम महाराष्ट्र देशा: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा कडाडत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी पक्षीय उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे अशा मतदारसंघात इतर उमेदवारांना पाठींबा दिला जात आहे. बार्शी मतदारसंघात अपक्ष उमेदवार महादेव एकनाथ काकडे यांना पुरस्कृत करण्यात येत असल्याची घोषणा वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घोषित केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज अधिकृत पत्रक काढत वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये बार्शी – एकनाथ काकडे, कळवा – मुंब्रा – फरहत शेख, बेलापूर – गौतम गायकवाड, चिंचवड – राहुल कलाटे, माढा – पांडुरंग खोत, जत – रवींद्र आरळी, सांगली – शेखर माने, माजलगाव – धम्मानंद साळवे यांना वंचितकडून पाठींबा देण्यात आला आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून पुरस्कृत करण्यात आलेल्या उमेदवारांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी काम करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.