fbpx

संसदेच्या सेन्ट्रल हॉल मध्ये आता अटलजींचीही प्रतिमा

atal-bihari-

टीम महाराष्ट्र देशा – संसदेच्या सेन्ट्रल हॉलमध्ये महात्मा गांधी, रबिंद्रनाथ टागोर, लाल बहाद्दूर शात्री, इंदिरा गांधी यांच्यासह एकूण २२ इतर व्यक्तींच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. आता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही प्रतिमा लावली जाणार आहे. संसदेच्या केंद्रीय सभागृहात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची पूर्णाकृती प्रतिमा लावण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

सेन्ट्रल हॉल ही संसदेमधली ती जागा आहे, जिथे राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनासाठी संबोधित करतात. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली आणि नरेंद्र सिंह तोमर यांनी या प्रतिमेसाठी प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे आता लवकरच अटलजींची प्रतिमा देखील संसदेच्या सेन्ट्रल हॉलमध्ये दिसेल.