fbpx

कवी मनाच्या अटलजींच मराठी प्रेम

मुंबई / प्राजक्त झावरे-पाटील : महाराष्ट्र आणि पंतप्रधान यांचं सूत कधी जुळलेच नाही. मराठी माणूस त्या पदावर विराजमान झाला नाही, याचं शल्य मराठी मनाला कायम आहे. पण गेल्या ७० वर्षात भारताला जे पंतप्रधान लाभले त्यातील दोनच पंतप्रधान चांगलं मराठी बोलत असल्याचं सांगितलं जाते. त्यातील एक म्हणजे पी. व्ही. नरसिंहराव तर दुसरे म्हणजे अटलबिहारी वाजपेयी.

नरसिंहराव बरेच वर्ष महाराष्ट्राच लोकसभेत प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांना ती माहीत असणे तसं साहजिक होते. ते रामटेक लोकसभा क्षेत्रातून सातत्याने निवडून येत होते. परंतु अटलजी कधीच महाराष्ट्रातून संसदेवर निवडून गेले नाहीत परंतु त्यांचं मराठी चांगले होते.

हिंदी अटलजींच्या सर्वाधिक आवडीची भाषा होती. तिच्यावर त्यांचं प्रचंड प्रभुत्व होत. तसेच इंग्रजी देखील चांगलं होतं आणि मराठी देखील उत्तम. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि आपल्या संत परंपरेवर ते भरभरून बोलत. महाराष्ट्र ही शूर वीर व संतांची भूमी आहे हे अटलजी नेहमी म्हणायाचे. अटलजींचे महाराष्ट्रात कोठेही भाषण असेल तर मराठीचा उल्लेख केल्याशिवाय ते आपले भाषण संपवत नसत. सुधीर फडके-गदिमा यांच गीत-रामायण अटलजींच्या आवडीच होत. त्यातील एका कार्यक्रमात ते सहभागी देखील झाले होते.!
मराठी मातृभाषा नसतानाही मराठीचा लळा असणाऱ्या या पंतप्रधानांना मराठी माणूस विसरू शकणार नाही..!

राज ठाकरे लिहिणार ‘या’ जेष्ठ गायिकेवर पुस्तक