महाराष्ट्रातील या शहरात उभारणार अटलजींचे स्मारक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा :  वाजपेयींनी विरोधी पक्षात असताना विरोधाला विरोध म्हणून कधी राजकारण केले नाही. त्यांचा रचनात्मक विरोध होता. सरकार जेव्हा चुकीचे काम करायचे तेव्हा सरकारला वठणीवर आणायचे काम त्यांनी केले. त्यांची वाणी चाबकापेक्षा तिखट होती, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांचे विचार निरंतन राहण्यासाठी त्यांच्या विचारांचे उचित स्मारक मुंबईत उभारण्यात येईल, अशी घोषणा नरिमन पॉइंट येथील एनसीपीएमध्ये सभेत मुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान, भाजपने अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यासाठी नरिमन पॉइंट येथील एनसीपीएमध्ये सभा आयोजित केली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते तसेच कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना राम नाईक म्हणाले की 1972मध्ये भिवंडीत जातीय दंगल उसळली होती, तेव्हा वाजपेयींनी भिवंडीला भेट दिली. त्यानंतर वाजपेयींच्या मुंबईतील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. वरळीत बंदिस्त जागेत वाजपेयींची सभा झाली. भिवंडीतील परिस्थिती पाहून ते व्यथित झाले होते. पण या सभेत भाषण करताना यापुढे हिंदू मार खाणार नाही, असे भाषण केले होते याची आठवण राम नाईक यांनी करून दिली.

दहिगाव उपसा सिंचन विशेष आवर्तन सुरु