अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर स्मृतीस्थळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह देश- विदेशातील अनेक नेते, मान्यवर उपस्थित होते.

भारतरत्न, राजकारणातील भीष्म पितामह मानले जाणारे अटलबिहारी वाजपेयी यांचे काल दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले होते. वाजपेयी यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. आज सकाळी भाजप मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्याचे आले होते. दुपारी एकच्या सुमारास भाजप मुख्यालयातुन अंत्ययात्रा इतर काढण्यात आली. यावेळी देशभरातील बहुतांश राजकीय नेते तसेच लाखोंचं जनसमुदाय उपस्थित होता.

bagdure

दरम्यान, आज 300 सैनिकांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी सैन्याच्या तिन्ही दलाकडून त्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतले अटलबिहारी वाजपेयी यांचे अत्यंंदर्शन

You might also like
Comments
Loading...