अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक

टीम महाराष्ट्र देशा – भाजपचे नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे गेल्या ६६ दिवसांपासून एम्समध्ये उपचार घेत आहेत. मात्र, 48 तासांपासून त्यांची प्रकृती अधिकच नाजूक बनली आहे.

वाजपेयी यांना मधुमेह आहे, त्याचबरोबर त्यांची केवळ एकच किडनी काम करते. २००९ मध्ये हार्ट अॅॅटॅॅक ही आला होता. त्यावेळी त्यांना भारतरत्न देखील घरी जाऊन देण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सुरेश प्रभू, स्मृती इराणी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साधारण 50 मिनिटे एम्स रुग्णालयात होते.

पंतप्रधानांनंतर केंद्रीय मंत्र्यांनीही रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीबद्दल विचार पूस केली. अनेक नेत्यांनी ट्विट करून वाजपेयींना दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना केली आहे.

दरम्यान, थोड्या वेळात एम्स हॉस्पिटलकडून मेडिकल बुलेटिन काढण्यात येणार आहे,