LIVE- अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक

टीम महाराष्ट्र देशा- माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून त्यांची विचारपूस करण्यासाठी भाजपाचे दिग्गज नेते एम्समध्ये पोहोचले.

गुरुवारी सकाळपासून अमित शाह, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सुषमा स्वराज, लालकृष्ण आडवाणी यांच्यासह अरविंद केजरीवाल व अन्य विरोधी पक्षातील नेतेही वाजपेयींची विचारपूस करण्यासाठी एम्समध्ये पोहोचले.

वाजपेयी यांना सध्या कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले असून त्यांना स्मृतीभ्रशांचा विकार आहे. त्याचबरोबर ते किडनी विकाराने सुद्धा त्रस्त आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

You might also like
Comments
Loading...