‘अटलबिहारी वाजपेयी’ विश्वासार्ह राजकीय नेतृत्वातील शेवटचा दुवा ; प्रकाश आंबेडकर

ओबीसी गणणेचा अहवाल प्रसिद्ध करण्याची सरकारची हिंमत नाही

मुंबई: विश्वासार्ह राजकीय नेतृत्वातील शेवटचा दुवा अटलबिहारी वाजपेयी होते. पक्षाच्या विरोधात मत मांडण्याची त्यांची ताकद होती. आजच्या राजकारणात तसे नेतृत्व दिसत नाही. असे मत प्रकाश आंबेडकर यांनी मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात आयोजित केलेल्या वार्तालापात व्यक्त केले.

देशात २००३ नंतर विश्वासार्ह राजकीय नेतृत्व निर्माण झाले नाही. यांनी तसेच जाती व्यवस्थेवर आधारित अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. या अर्थव्यवस्थेने अनेक मागास जातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक मागास जातीसमूह विकासापासून वंचित राहिले आहेत. हे वास्तव उजेडात येईल म्हणून ओबीसी गणणेचा अहवाल प्रसिद्ध करण्याची सरकारची हिंमत होत नाही. असेही आंबेडकर म्हणाले.