अटल बिहारी वाजपेयी उपचारासाठी ‘एम्स’मध्ये दाखल

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ते दिल्लीतील ‘एम्स’मध्ये दाखल झाले आहेत.

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली अटल बिहारी वाजपेयी यांची तपासणी केली जाईल, अशी माहिती भाजपने दिली. वाजपेयींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने भाजपने पत्रक काढून त्यासंदर्भात माहिती दिली.

अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे माजी पंतप्रधान आहेत. राजकीय आणि सरकारमधील अनेक पदं त्यांनी भूषवली. 93 वर्षीय वाजपेयी हे सध्या प्रकृती अस्वथ्यामुळे राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त आहेत.