fbpx

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांत आता 35 रुपये किलो दराने तूरडाळ

नवी मुंबई : राज्यातील ग्राहकांच्या हितासाठी स्वस्त धान्य दुकानातून सध्या विक्री करण्यात येत असलेल्या तूरडाळीच्या प्रति किलो 55 रुपयांच्या दरात सुधारणा करण्यात आली असून आता प्रति किलो 35 रुपयांप्रमाणे विक्री करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

कर्नाटक व तामिळनाडू या राज्यांमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तूरडाळीचा पुरवठा अनुक्रमे 38 रुपये आणि 30 रुपये प्रती किलो याप्रमाणे केला जातो. या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत कमीत कमी किंमतीत तूरडाळीची विक्री करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे . त्याचप्रमाणे शासनाचे सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था,पूर्णतः अथवा अंशतः अनुदानित संस्था याद्वारे होणारी तूरडाळीची खरेदी पुढील आदेश होईपर्यंत फक्त महाराष्ट्र राज्य पणन महासंघाकडून शासकीय दराने करण्यास बंधनकारक करण्यात आली आहे.