आषाढीनिमित्त ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड विठुरायाच्या चरणी

मुंबई: २० जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र तसेच शेजारील राज्यातील पायी चालत पंढरपुरला येतात. मात्र कोरोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या दिवशी पायी वारीला सरकारने परवानगी नाकारली आहे. यामुळे भावीक जवळ असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरात दर्शन घेत आहेत.

याच पार्श्वभूमिवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड जेष्ट संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या देहू गावी जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. दर्शन केल्यानंतर प्राजक्ताने हे फोटो इन्स्टाग्राम या सोशल मीडीयावर शेअर केले आहे. ‘तु सकल जगाचा त्राता’ असे कॅप्शन देत देहु येथील विठ्ठलाचे दर्शन घेताना व्हिडीओ पोस्ट केला आहे.

विठ्ठलाच्या चरणी डोके टेकवताना प्राजक्ताच्या या पोस्टला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. झी मराठी या वाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महारानी येसुबाई यांच्या भूमिकेने त्या घराघरात पोहोचल्या. यानंतर त्यांनी स्टार प्रवाह वरील ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेद्वारे पुनरागमन केले होते. मात्र काही दिवसातच त्यांनी ही मालिका सोडली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP