पुणे : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. या प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त करत त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा निर्णय दिला. त्यांच्या या सुटकेनंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुर्याला देखील ग्रहण असतं. पण ते काही काळच असतं. मात्र, ग्रहण संपल्यानंतर सुर्यांचा प्रकाश आधीपेक्षा जास्त प्रखर होत असतो. त्यामुळे सत्य परेशान हो सकता है लेकिन, पराजित नहीं! हे भुजबळ साहेबांच्या सुटकेवरुन सिद्ध होतं, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. रुपाली चाकणकरांनी याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दरम्यान, भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर भुजबळ यांनी ‘वर्षा’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. ‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए…ये जनता की दुवाऐं है उन्हे मुक्कमल नहीं होने देती…’ अशी शायरी करत भुजबळ यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. माझ्यावर खोटे आरोप करून अडकवण्याचा प्रयत्न झाला. पण माझा न्यायदेवतेवर विश्वास होता, असं देखील भुजबळ म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी कडक निर्बंध लावावेच लागतील’, मंत्री नितीन राऊतांचा इशारा
- ‘शहराचे हित जोपासले गेले नाही तरी चालेल पण स्वत:चे आर्थिक हित जोपासले गेले पाहिजे हाच भाजपचा उद्देश’
- ‘मोदींनी चार प्रमुख सुधारणा केल्यास नवीन कृषी कायदे मान्य’, भारतीय किसान संघाची भूमिका
- बारामतीच्या काका-पुतण्यावर किरीट सोमय्या यांचा पुण्यात हल्लाबोल
- ‘..मग नारायण राणे महायेडे होते का?’, गुलाबराव पाटलांचा नितेश राणेंना खोचक सवाल