पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघ मजबूत स्थितीत

पुजाराने कसोटी कारकीर्दीतले 17 वे शतक ठोकले

टीम महाराष्ट्र देशा : सिडनीच्या मैदानावर आज बोर्डर – गावस्कर कसोटी मालिकेचा चौथा सामना रंगला. पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघ ४ बाद ३०३ अशा मजबूत स्थितीत आहे. चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकामुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर दबाव निर्माण करता आला. पुजारा बरोबरच मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांनी देखील संयमी फलंदाजी ने भारताच्या धावफलकाला सतत अस्थिर ठेवले. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना मात्र अल्प धावांवर समाधान मानावे लागले.

भारताने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. सुरवातीला फलंदाजी करताना भारतीय संघ डगमगताना दिसला कारण सध्या फॉर्म ऑऊट असलेला भारताचा सलामीचा फलंदाज लोकेश राहुल हा अवघे ९ धावांवर तंबूत परतला. त्याच्या मागे मात्र चेतेश्वर पुजाराच्या साथीने मयांक अग्रवालने आक्रमक खेळी खेळत डाव सावरून घेतला. उपहारा नंतर मात्र मयांक अग्रवाल हा ७७ धावावर झेल बाद झाला.त्यानंतर आलेले भारतीय कर्णधार कोहली (२३ धावा) आणि उपकर्णधार राहणे (१८ धावा) हे मात्र स्वस्तात माघारी परतले. मधल्या फळीची पडझड होत असतानाच चेतेश्वर पुजाराने एक बाजू भक्कम केली होती. त्यानंतर हनुमा विहारी ने मात्र पुजाराला साथ देत दिवसाअखेर पर्यंत डाव सांभाळला.

पहिल्या दिवसाअखेर भारताचा धावफलक ४ बाद ३०३ धावा असा असून पुजारा 130 आणि हनुमा विहारी 39 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियन संघासाठी आजचा दिवस काहीसा खट्टामिठा होता. तरी हेझलवूडने 2 तर लायन आणि स्टार्कने प्रत्येकी एक अशा विकेट घेतल्या.

You might also like
Comments
Loading...