लोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज देशभरातील ९५ तदारसंघात मतदान पार पडले. या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १० मतदारसंघाचा समावेश होता. तर दिवसा अखेर या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान झाले. नांदेड मध्ये सर्वाधिक म्हणजे ६०.६८ टक्के मतदान झाले तर बीड , लातूर , उस्मानाबाद -, परभणी , अकोला , बुलडाणा , अमरावती या मतदार संघांमध्ये ५५ टक्के मतदान झाले.

मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १० मतदारसंघामध्ये मतदान झाले. तर त्यामध्ये बीड , सोलापूर , उस्मानाबाद , अमरावती , नांदेड या मतदार संघातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.बीड मध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे यांच्यामध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरु आहे, प्रीतम मुंडे यांच्या होमग्राउंडमध्ये बजरंग सोनावणे यांनी आव्हान उभे केले आहे. तर सोलापूरमध्ये कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार , वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी अशी तिहेरी लढत पहिला मिळणार आहे.

अमरावतीमध्ये नवनीत कौर राणा आणि आनंदराव आडसुळ यांच्या मध्ये चुरशीची लढत पहिला मिळणार आहे. तर उस्मानाबाद मध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील आमने सामने आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढती विशेष महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत.

दरम्यान या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदाना दरम्यान ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट मशिन जोडण्यात आले आहे. मतदानावेळी कोणताही गैरप्रकार किंवा घोटाळा होऊ नये यासाठी ही विशेष यंत्रणा जोडण्यात आली आहे. सोलापूर मतदार संघात या आतापर्यंत १४९ व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आले आहेत. तर अनेक भागात ईव्हिएम मशीन बाबत तक्रारी देखील आल्या.