राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या बूथ तिथे शाखेचा दुसरा टप्पा पूर्ण

नाशिक: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या संकल्पनेतून गाव तिथे शाखा व घर तिथे झेंडा या अभियानास सुरूवात करण्यात आली होती. राज्यात टप्प्याटप्प्याने पाच हजार शाखा उद्घाटन करण्यात येणार असल्याने या उपक्रमांतर्गत नाशिक शहर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बूथ तिथे शाखा असा उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्याचा दुसरा टप्पा आज नाशिक शहरात युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण झाला. या शाखांचे उद्घाटन आ.जयवंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नानासाहेब महाले व मनपा गटनेते गजानन शेलार यांनी केले.

Loading...

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बूथ तिथे शाखा हे अभियान हाती घेण्यात आले होते. राज्यभरात पाच हजार शाखाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत मोठ्या प्रमाणावर नाशिक शहरातही शाखा उद्घाटनाचा दुसरा टप्पा मोठ्या उत्साहात पार पडला. पहिल्या टप्प्यातील शाखा उद्घाटन युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी केले होते. या अभियानातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला अधिक बळकटी प्राप्त होणार असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. नाशिक शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस हे नाशिक शहर व परिसरात विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवितात. तसेच पर्यावरण रक्षणासाठी देखील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कायम अग्रेसर असते. या दृष्टीने नाशिक शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने पुढकार घेत शहरात मोठ्या प्रमाणावर शाखा उद्घाटन केले आहे.Loading…


Loading…

Loading...