fbpx

हेल्मेटसक्ती : विवेक वेलणकरांवरच पहिल्यांदा कारवाई करा – दिवाकर रावते

टीम महाराष्ट्र देशा :  पुण्यामध्ये नवीन वर्षाच्या सुरवातीलाच हेल्मेट सक्ती वरून वादाला तोंड फुटले  आहे. कारण शासनाने २ महिन्यापूर्वीच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दुचाकी स्वारांना १ जानेवारी पासून हेल्मेट सक्तीचा कायदा जाहीर केला होता आणि आजपासून त्या कायद्याची अमलबजावणी देखील करण्यात आली आहे .यावर मात्र पुणे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी हेल्मेटसक्तीला विरोध केला आहे. याच पार्श्वंभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी थेट विवेक वेलणकरांवरच पहिल्यांदा कारवाई करा असे आदेश दिले आहेत.

रावते म्हणाले कि , ‘हेल्मेट सक्ती हा केंद्राचा कायदा आहे. नागरिक मंच नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी असतात. तिथल्या प्रमुखांनीच विरोध करणं हे चुकीचे आहे . हेल्मेटलासक्ती का केली जाते, असा उलट प्रश्न त्यांनी विवेक वेलणकर यांना यावेळी केला.

या आधी देखील पुण्यात पोलीस आयुक्तांनी हेल्मेटबाबत कायदेशीर अंमलबजावणीसाठी आवाहन केलं होतं. लोकांचा जीव वाचावा, हा मूळ हेतू आहे पण पुणेकरांनी हेल्मेट का घालावं हा वाद घालत कायद्याला कात्री लावली होती.असेही दिवाकर रावते म्हणाले.

1 Comment

Click here to post a comment