‘विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव द्या अन्यथा…’ ; भूमीपूत्रांनी दिला सरकारला इशारा

nvai mumbai

मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे या मागणीने जोर पकडला आहे. रिपाईसोबतच अनेक समाजिक संघटना ही मागणी करताना दिसून येत आहेत. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आलेली आहे. तरी देखील अचानकपणे 17 एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

नवी मुंबई विनानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. त्यावर या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापायला सुरु झाले आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे, पालघर, रायगड या परिसरात १० जून रोजी भू्मीपत्रांनी मानवी साखळी आंदोलन केले. त्यानंतर आत्ता सिडकोला घेराव घालण्यासाठी 24 जून रोजी आंदोलन केले जाणार आहे.

खासदार कपिल पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले कि, ‘ आपला समाज एखादा विषय पकडतो आणि सोडन देतो. या आंदोलनात जो सहभागी होईल तोच खरा भूमीपूत्र आहे. ही भूमिका प्रत्येक भूमीपूत्रपर्यंत पोचविल्यास आंदोलनास व्यापक स्वरुप प्राप्त होऊ शकते. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे.

त्यावेळी आमचा त्याला विरोध नव्हता. पण दि. बांच्या नावाला त्यांचा विरोध असण्याचे कारण नाही. सिडकोने पारित केलेल्या ठरावानंतर सिडको आली कूठून असा काही नेते मंडळी सवाल उपस्थित करीत असली तीर सिडकोला भूमीपूत्रांनी जागा दिली आहे म्हणून सिडको आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची भूमिका मांडलेली नाही.त्यांची भूमिका स्पष्ट होताच त्याचा प्रत्येक कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी होईल. त्यामुळे आंदोलन व्यापक होईल.’ असा इशारा त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP