सध्या तरी आमची युती, सरकार पाच वर्ष पूर्ण करेल : मुख्यमंत्री

सध्या तरी युती आहे व सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची शिवसेनेच्या घोषणेची दखल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी दावोसला गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे दिसते. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. सध्या तरी आमची युती आहे, आणि हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास फडणवीस यांनी दावोस येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केला..

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा ठराव एकमताने झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भाषणात यापुढे शिवसेना देशातील सर्व निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले. दावोसला गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या भाषणात अनेक गोष्टी बोललेल्या आहेत. वाट पाहूयात.. सध्या तरी मी यावर जास्त बोलणार नाही. पण आमचे युतीचे सरकार सध्या आहे, आणि हे सरकार पाच वर्षांचा आपला कालावधीही पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

bagdure

You might also like
Comments
Loading...