fbpx

माढा, सोलापूरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का, …या नेत्याने देखील कॉंग्रेसचा हात सोडत भाजपात केला प्रवेश

bjp vr congress

टीम महाराष्ट्र देशा : माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस आघाडीला मोठा धक्का बसला आहे.राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील, साताराचे रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठोपाठ आता माढ्यातील कॉंग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी देखील भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
या निवडणुकीत युतीचा उमेदवार म्हणून भाजप कडून रणजीतसिंह निंबाळकर यांना रिंगणात उतरवण्यात आल आहे तर रणजीतसिंह यांना आघाडी कडून संजय शिंदे यांचे आव्हान असणार आहे. या रंगतदार लढाई मध्ये आघाडी आणि युती कडून जोरदार प्रचार होत असतानाच कॉंग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी कॉंग्रेसचा हात सोडत भाजपला जवळ केले आहे. कल्याणराव काळे यांच्या या सोडचिठ्ठी मुळे कॉंग्रेसला माढ्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

कल्याणराव काळे यांना पंढरपूर आणि माढ्यामध्ये मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे. साखर कारखाना तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून ते काम करत आहेत. माढा मतदारसंघात येणाऱ्या पंढरपूर भागातील ४३ गावांमध्ये काळे यांचा प्रभाव आहे. पंचक्रोषित काळे यांचा चांगलाच दबदबा असल्याने त्यांच्या या भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेस आघाडीला चांगलाच फटका बसणार आहे.