अखेर अंधार दूर झाला; सिल्लोड शहरात हायमास्टच्या कामांना वेग!

abdul sameer

औरंगाबाद : शहरातील रजाळवाडी येथे नगर परिषदेच्या वतीने बसविण्यात आलेल्या हायमास्टचे लोकार्पण उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते  करण्यात झाले. यासोबतच शहरातील अनेक रस्ते चकाचक झाले असून सिल्लोड नगरपालिकेकडून आणखी काही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. येणारा काळात शहराच्या सौंदर्यात यात आणखी भर पडेल

यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम यांच्यासह डॉ. संजय जामकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, न.प.तील गटनेते तथा कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शहरालगत असलेल्या खोडकाई वाडी, पाबळवाडी, सपकाळ वाडी, पंडित वाडी, यशवंत वाडी वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामे नगर परिषदेकडून करण्यात आली असून सदरील रस्ते चकाचक झाले आहेत.

रजाळवाडी रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होईल असे स्पष्ट करीत येत्या काळात वाडी वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड तसेच येथील शिक्षण व्यवस्थेचे अद्यावतीकरण करून येथे वाचनालय सुरू करणार असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी याप्रसंगी केले. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वाडी वस्त्यांमध्येही शहराप्रमाणे नागरिकांसाठी सर्व मूलभूत सुविधा निर्माण करण्याचे काम नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत असल्याचे समीर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या