एका वर्षात औरंगाबाद रेल्वेस्थानकात झाल्या ‘एवढ्या’ चोऱ्या; रेल्वे पोलिसांचे अपयश!

एका वर्षात औरंगाबाद रेल्वेस्थानकात झाल्या ‘एवढ्या’ चोऱ्या; रेल्वे पोलिसांचे अपयश!

railway station

औरंगाबाद : रेल्वे स्थानकावर अनेकजण प्लॅटफॉर्म तिकीट काढतच नाहीत. त्यातच रेल्वे स्थानकावर तपासणी देखील होत नसून चारही बाजूंनी रेल्वे स्थानकावर कुणीही सहज प्रवेश करू शकतात. त्याचा फायदा चोरट्यांकडून घेतला जात आहे. तसेच विविध प्रकारचे गुन्हे देखील होत आहेत. ययावर्षी १ जानेवारी ते १० ऑक्टोबर दरम्यान रेल्वे स्थानक आणि धावत्या रेल्वेत झालेल्या गुन्ह्यांच्या अहवालानुसार १२४ गुन्ह्यांची नोंद रेल्वे लोहमार्ग पोलिस विभागाने केली आहे. चोरट्यांनी तब्बल २४ लाख ३७ हजार ३७२ रुपयांचा ऐवज पळविला आहे.

औरंगाबाद रेल्वे लोहमार्ग पोलिसांच्या वतीने यावर्षी जानेवारी ते १० ऑक्टोबर दरम्यान नोंद केलेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये १२४ गुन्हे झाले आहेत. त्यात गंभीर गुन्हा-१ तर विनयभंग-१, दंगलीचा गुन्हा -१, जबरी चोरी -४ तर इतर ११६ चोऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी सतर्कता बाळगावी, काळजी घ्यावी. चोरांपासून सावध राहावे, संशयीत आढळून आल्यास प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी. असे आवाहन रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी केले आहेत.

रेल्वे स्थानक आणि धावत्या रेल्वेत प्रवाशांच्या एकूण ११६ चोऱ्या झाल्याची नोंद रेल्वे विभागाने केली आहे. त्यात पॉकेट -८, बॅग -४१, सोन्याच्या दोन साखळ्या चोरांनी पळविल्या आहेत. त्यात एकूण २४ लाख २७ हजार ३७२ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. त्यापैकी केवळ एकूण ३ लाख ८३ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल रेल्वे पोलिसांना सापडला आहे. तर अजूनही २० लाख ४३ हजार ८०२ रुपयांचा मुद्देमाल रेल्वे पोलिसांना सापडलेला नसून त्याचा शोध घेणे सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या