बुलेट ट्रेन तर करणारच; चंद्रकांत पाटलांचे राज ठाकरेंना उत्तर

वेबटीम: एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनवर काल झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले. मात्र या घटनेनंतर सरकार विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. तर आज मुंबईकरांचा रेल्वेप्रवास सुरक्षित आणि सुखकर होत नाही तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नसल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच 5 ऑक्टोबरला चर्चगेटला रेल्वेच्या कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचे सांगितले.

आता राज ठाकरे यांना उत्तर देत भाजप सरकार बुलेट ट्रेन केल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरे यांना काय करायचंय ते त्यांनी ठरवावं, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असल्याच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.