जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ३४४ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. तब्बल साडेपाच तास चाललेल्या या बैठकीत पुढील वर्षीच्या ३४४ कोटी रुपयांच्या विविध विकास कामाच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत बैठकीतील निर्णयांची माहिती दिली यावेळी बीडचे आमदार क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे उपस्थित होते. मागील सरकारमध्ये झालेल्या कारभारावर ताशेरे ओढताना भाजपच्याच आमदारांच्या तोंडून प्रि-फॅब्रिकेटेड अंगणवाड्याचा जवळपास २४ कोटी आखर्चित निधी परत गेला असल्याचे बैठकीत उघड झाल्याचे मुंडे म्हणाले.

Loading...

जिल्ह्यातील नारायणगड, गहिनीनाथ गड व १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ मंदिर येथील तीर्थक्षेत्र विकास आरखड्याच्या बाबतीतही आकडेवारी फुगवून सांगण्यात आल्या होत्या हे स्पष्ट झाले. नारायणगड येथे घोषित २५ कोटी मात्र प्रत्यक्षात मात्र केवळ ३ कोटी निधी मंजूर असून केवळ एकाच सभागृहाचे काम सुरू आहे. गहिणींनाथगडाच्या शौचालयाचे बांधकामही केवळ 80 लाख निधीतून सुरू असून उर्वरित निधी मंजूर नाही; तर वैद्यनाथ मंदिराच्या घोषित १३३ कोटी रुपयांचा विकास आराखडा हा केवळ फार्स असून प्रत्यक्षात केवळ १० कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता असल्याचे या बैठकीत उघड झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

जिल्ह्यात सर्व विभागांमध्ये केवळ ४८ टक्के अधिकारी कर्मचारी कार्यरत असून ५२ टक्के पदे रिक्त असल्याचेही ना. मुंडे म्हणाले; तसेच याबाबत जिल्हाधिका-यांमार्फत अहवाल मागवला असुन महिनाअखेर पर्यंत कर्मचाऱ्यांचा अनुशेष ८५% पर्यंत भरून काढू असेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीदरम्यान ना. मुंडेंनी विद्युत वितरण कंपनीला शेतकऱ्यांना २४ तासांच्या आत ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्या अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराच दिला आहे. तसेच नियोजन आराखड्यामध्ये यासाठी विशेष ५ कोटी रुपयांची तरतूदही केली असल्याचे जाहीर केले.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण