Asus Zenfone AR- असुस झेनफोन एआर भारतात

असुस कंपनीने भारतात तब्बल आठ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असणारा आपला झेनफोन एआर हा फ्लॅगशीप स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेेठेत ४९,९९९ रूपये मुल्यात लाँच केला आहे.

झेनफोन एआर या मॉडेलमध्ये प्रथमच ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजेच एआर आणि व्हिआर या दोन्ही प्रकारांचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. अर्थात गुगलच्या टँगो आणि डे ड्रीम या प्रकारांना सपोर्ट करणारा हा पहिलाच स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा अतिशय शक्तीशाली असा स्नॅपड्रॅगन ८२१ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. यात ५.७ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले असेल. हे मॉडेल अँड्रॉईडच्या ७.० नोगट प्रणालीवर चालणारे असून यात ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. वर नमुद केल्यानुसार याची रॅम आठ जीबी राहणार असून इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी इतके असेल.मुख्य कॅमेरा २३ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण शक्य आहे. याशिवाय यात मागील बाजूसच फिशआय लेन्स असणारा दुसरा कॅमेरादेखील प्रदान करण्यात आला आहे. हे मॉडेल ग्राहकांना फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.