प्रज्ञा सिंह ठाकूर पंतप्रधान मोदींच्या अभियानाला आव्हान देतायत – असदुद्दीन ओवैसी

टीम महाराष्ट्र देशा :  खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मी गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी खासदार झाले नाही या वक्तव्यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच अभियानाला आव्हान दिले आहे, असे ओवैसी यांनी म्हंटले.

खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दोन दिवसांपूर्वी मी गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी खासदार झाली नसल्याचं वक्तव्य केले होते. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या या वक्तव्या नंतर त्यांच्यावर सर्व स्तरावरून टीकास्त्र सोडण्यात आले. याचदरम्यान प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या या वक्तव्यावरून असदुद्दीन ओवैसी यांनी यांच्यावर निशाणा साधला. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच अभियानाला आव्हान दिले आहे. शौचालये साफ करण्यास त्यांनी नकार दिला. असं असेल तर देश न्यू इंडिया कसा होईल’ असे ओवैसी यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर भारतातला जातीवाद कायम राहावा हीच त्यांची मनीषा आहे. ‘ठाकूर यांच्या वक्तव्याचे मला आश्चर्य वाटत नाही किंवा मला धक्काही बसलेला नाही. कारण ते अशाच प्रकारचा विचार करतात. यावरुन त्यांचा देशातील जातीव्यवस्था आणि भेदभावावर विश्वास असल्याचे स्पष्ट होते’ असंही ओवैसी यांनी म्हटलं.