पुसद येथे अवैध सावकारी प्रकरणी सहाय्यक निबंधकांची धाड

यवतमाळ / संदेश कान्हु : अवैध सावकारी प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील श्रीरामपुर मधील सावकाराच्या मालकीच्या सलुन तसेच निवासस्थानी शुक्रवारी सहाय्यक निबंधक पुसद यांनी धाड टाकून अनेक कागद पत्र ताब्यात घेतली आहे.
पुसद येथील रघुनाथ डाखोरे व भीमराव तांबारे, नारायण सावंत यांनी सुभाष भोरे व विजय भोरे यांच्या विरोधात अवैध सावकारी संदर्भात जिल्हा निबंधक व सहाय्यक निबंधक यांचे कड़े तक्रार दिली होती. कर्जाची व्याजासह परतफेड केल्यानंतर सुद्धा भोरे यांनी गहाण असलेली कागद पत्र देण्यास नकार दिल्याने भोरे यांच्या विरोधात तक्रारकर्त्यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक जी एन नाईक यांनी स्टेयलो जेंट्स पार्लर व भोरे यांच्या निवसस्थानी धाड़ टाकली. या कारवाईत 26 ATM card’s,विविध बँकांचे 8 चेक बुक,124 पास बुक,13 कोरे चेंज बुक,यासह हिशोब वही जप्त केली असल्याचे समजते.