पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करा; मुख्यमंत्र्यांनी दिले प्रशासनाला आदेश

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडत आहे. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोक पुरात अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या बचावासाठी गोवा कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर कोल्हापुरात एअरलिफ्टिंगसाठी दाखल झाले आहेत. तसेच एनडीआरएफ आणि नेव्हीचे जवान देखील बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत.

या सर्व पूरस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या पुर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत अशा सूचना प्रशाष्णाला दिल्या आहेत.

तसेच दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये तसेच पुरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न धान्य, पिण्याचे पाणी आदि सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ज्या भागात पुरामुळे लोक अडकले आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.

दरम्यान, सांगलीत जिल्ह्यात देखील अशीचं आपत्ती आली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कृष्णा नदीला पूर आला आहे. नदी काठचा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. या सर्व भागांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारतर्फे दोन मंत्र्यांना म्हणजे चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांना सरकारने पूरग्रस्त भागात पाठवले आहे.

पिचडांनी शेतकऱ्यांची जमीन लाटली, धनंजय मुंडेंचा आरोप

राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली, मुख्यमंत्री मात्र भलत्याच कामात मग्न – जयंत 

मुख्यमंत्र्यांचा विश्वास फक्त महाजन आणि चंद्रकांत पाटलांवरच : पृथ्वीराज चव्हाण

IMP