कपाळावर चंद्रकोर काढून फिरण्यापेक्षा छत्रपतींचे विचार आत्मसाद करा, शिवलीला पाटील यांचे आवाहन

shivlila patil

नांदेड :  युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगिकारावेत, असे आवाहन टीव्ही स्टार हभप शिवलिला पाटील यांनी लोहा येथे गुरुवारी केले. लोहा शहरातील देऊळगल्ली येथे श्री बालाजी भगवान नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त हभप शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शिवलीला पाटील आजच्या युवकांच्या जीवनशैली बाबतीत बोलताना म्हणाल्या की, ‘आजकालचे युवक हे रोजच छत्रपती शिवाजी महाराज होऊन फिरतात. भगवे कपडे घालून कपाळावर चंद्र कोर काढून गाड्यांचा आवाज करीत पुढे -पुढे फिरतात. असे न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. ज्या मध्ये पर स्त्रीकडे बघणाऱ्यांचे डोळे काढले जात, हात टाकणाऱ्यांचे हात कलम केले जात होते. असे आमचे राजे होते आणि तुम्ही त्यांच्या सारखे दिसण्यापेक्षा त्यांचे गुण अंगीकारावेत.

शिवाजी महारांचा आदर्श घेत त्यांच्या अंगी असलेले गुण अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले. त्यांनी आपल्या दोन तासांच्या कीर्तनात समाजातील विविध घडामोडींवर भाष्य केले. या कार्यक्रमाला लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या