fbpx

Breaking : भाजपची विजयी सुरुवात,निवडणुकीच्या आधीच भाजपने खाते उघडले

टीम महाराष्ट्र देशा- २०१९ मध्ये होणाऱ्या जनोत्सवाचा पहिला निकाल लागला आहे. अरुणाचल मधील आलो ईस्ट या विधानसभा क्षेत्रातून सर केंटो जिनी यांनी बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. दशकानुदशकांचा नॉर्थ इस्टचा अनुशेष भरून काढण्यासाठी भाजप सरकारने केलेल्या प्रयत्नांना पूर्वोत्तर मधील जनता सकारात्मक प्रतिसाद देताना पहायला मिळत आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये 11 एप्रिल रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. केंटो जिनी यांच्यासमोर कोणीही वैध उमेदवार विरोधी पक्षांना देता आला नाही. यानंतर केंटो जिनी यांना विजयी घोषित करण्यात आले.

दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या रणसंग्रामामुळे देशातील वातावरण तापले आहे. केंद्रसरकारच्या कल्याणकारी योजना आणि केलेली कामे यामुळे भाजप पूर्ण बहुमताने देशात पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास भाजप नेत्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.