शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून राज्यात लढविणार ३० जागा

जालना : शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून राज्यातील विविध मतदारसंघांत तीस लढवणार आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी मराठवाड्यात आठ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. लवकरच उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी घनवट यांनी सांगितले. घनवट म्हणाले, आतापर्यंत आलेल्या सगळ्या पक्षांचे सरकार शेतकरी विरोधी निघाले.

त्यांना विरोध करण्यासाठी व शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील पंधरा इच्छुक उमेदवारांच्या शेतकरी संघटनेतर्फे रविवारी मुलाखती घेण्यात आल्या. जालना जिल्ह्यात जालना व घनसावंगी मतदारसंघासाठी प्रबळ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. लवकरच उमेदवारांची नावे जाहीर केले जातील, असे त्यांनी नमूद केले.

स्वतंत्र भारत पक्षाचे सचिव गुणवंतराव पाटील म्हणाले, की शेतकरी संघटना ही खुल्या व्यवस्थेचा पुरस्कार करते. शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ मिळावी, यासाठी आमचा लढा कायम असणार आहे. सध्याचे काही राजकीय पक्ष जातीवाद व धर्मवादावर जनतेची दिशाभूल करून निवडणुका लढवित आहेत. मात्र, आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अर्थवाद मांडत राहू. यावेळी शेतकरी संघटनेचे मराठवाडा पदाधिकारी उपस्थिती होते.

महत्वाच्या बातम्या