fbpx

नववधूला मिळणार 1 तोळे सोनं मोफत

गुवाहाटी – लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ही अतिशय महत्वपूर्ण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणा राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहेत. अशीच एक घोषणा सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.

आसाम सरकारनं नुकताच अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी आर्थिक वर्ष 2019-20साठी सादर केलेल्या विधानसभा अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यात नववधूला 1 तोळे सोनं मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आसाममधल्या सर्व समुदायाच्या नववधूंना एक तोळे सोनं दिलं जाणार असून, त्याची अंदाजे किंमत 38 हजारांच्या घरात आहे.

याशिवाय,45 वर्षांच्या महिलेच्या पतीचं निधन झाल्यास तिच्या कुटुंबीयांना तात्काळ मदतीच्या स्वरूपात 25 हजार रुपये प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच त्या पत्नीला 60 वर्षांच्या वयोमर्यादेपर्यंत प्रतिमहिना 250 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. 60 वर्षांच्या नंतर त्या महिलेला वृद्धावस्थेतील पेन्शनचाही लाभ मिळणार आहे.