जिंकलंस पोरी : फुटपाथवर राहणाऱ्या आस्माच्या यशापुढे आकाश देखील ठेंगणे

asma shaikh

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल एकूण ९५.३० टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. याही वेळी मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थीनीचा निकाल ९६.९१ टक्के लागला असून विद्यार्थीचा – ९३.९० टक्के लागला आहे. तर यंदाही राज्यात मुलीच अव्वल आहेत. दुसरीकडे सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२.७३ टक्के लागला असून सरासरी माघील वर्षापेक्षा १८ टक्क्यांनी निकाल वाढला आहे.

या दहावीच्या परीक्षेत मुंबईच्या फुटपाथवर राहणाऱ्या १७ वर्षीय आस्मा शेखनं यश मिळवलं आहे. या मुलीनं अत्यंत हालाखीच्या परिस्थितीवर मात करत ४० टक्क्यांनी दहावीत पास झाली, तिचा संघर्ष पाहिला तर हे ४० टक्केही ९० टक्क्यांहून अधिक असल्याचं तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरुन तुम्हालाही समजेल.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, आता १ लाख शेतमजुरांना देणार प्रशिक्षण

याबाबत आस्मा शेखनं सांगितले की, मी शिक्षण घेण्यासाठी आयुष्यात प्रचंड मेहनत करत आहे. अभ्यास करण्यासाठी तिने रस्त्यावरील स्ट्रीट लाइटचा वापर केला आहे. रात्रीच्या वेळी गर्दी कमी असल्याने जास्तीत जास्त वेळ रात्रीचा अभ्यास करण्यावर भर दिला. पावसाच्या काळात अभ्यास करण्यास अनेकदा अडचणी येत होत्या. पण त्यावेळी वडिल राहण्यासाठी प्लास्टिकचं शेड बनवत असल्याचं तिने सांगितले.

तसेच मला जे मार्क्स मिळाले आहेत त्यापेक्षा अधिकची अपेक्षा केली होती, ४० टक्क्यांहून जास्त गुण मिळतील असं तिला वाटत होतं. पण जे गुण मिळाले त्यातही ती आनंदी आहे. यापुढील शिक्षण तिला आर्टस या विषयात घेण्याची इच्छा आहे. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक लोकांनी मला मदतीसाठी आश्वासन दिलं आहे. यापुढे आणखी मेहनत करण्यासाठी लोकांकडून प्रोत्साहन मिळत असल्याचं आस्मा शेखने सांगितले.

काळजी करू नका अजितदादांचे पुण्यावर बारीक लक्ष – उद्धव ठाकरे