‘शिवरायांच्या नावानं मतं मागणं म्हणजे महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे’

टीम महाराष्ट्र देशा- भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करण्याआधी शाह यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभली ती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची. ठाकरे यांनी आमच्यात मतभेद होते पण आता आमचं मन जुळलं आहे असं सांगत भाजपाध्यक्ष अमित शाह यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन गांधीनगरमधील मतदारांना केलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ५ वर्ष एकमेकांना ‘पटकणारे’, कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज अफझलखानाच्या सेनेच्या सेनापतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट गांधीनगर गाठतात! असले फितूर वाघ असूच शकत नाहीत. शिवसैनिक तर मुळीच नाही. शिवरायांच्या नावानं मतं मागणं म्हणजे महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे असं पवार यांनी म्हटलं आहे.

शिवसेना भाजपमध्ये असलेला दुरावा दूर झाल्याचा दावा दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र विरोधकांना ठाकरे यांचे गुजरातमध्ये जाणे चांगलेच जिव्हारी लागल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील शिवसेनेवर टीका केली आहे.

2 Comments

Click here to post a comment