छत्रपतींच्या वंशजांकडून पुरावे मागतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी? आशिष शेलारांचा महाविकास आघाडीला चपराक

Ashish Shelar vs uddhav

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला तो आग्य्रातल्या औरंगजेबाच्या दरबारातून. महाराजांनी याच दरबारातल्या अपमानाचा बदला घेवून अखंड हिंदुस्तानावर राज्य केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे केले आहे. मात्र याची दखल घेण्याची तसदी ना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली ना हिंदुत्ववादी पक्ष म्हणून मिरवणाऱ्या शिवसेनेने घेतली.तर महाविकास आघाडीतील काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसला देखील या विषयाचा साधा उल्लेख करण्याची गरज देखील वाटलेली नाही.

जेव्हा पासून योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यापासून योगी आदित्यनाथ वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणांचे नावं बदलत आहे. मुघलांची ओळख आम्हाला नकोय आणि आम्हाला आमच्या संस्कृतीवर गौरव आहे, असं योगींनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांंचा अपमान करून त्यांना कैद केले होते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीने ‘आग्र्याहून सुटका’ करून घेतली होती.आता या नामकरणामुळे महाराष्ट्रात आनंद व्यक्त केला जात आहे.

यावरून आता भाजपचे आमदार ऍड. आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ” ताजमहालाच्या शेजारी उभारण्यात येणाऱ्या मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा.योगी आदित्यनाथ यांनी केला. त्यामुळे आग्राला महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाचा भगवा झेंडा फडकणार! योगी आदित्यनाथ जी यांचे अभिनंदन!” असे ट्विट शेलरांनी केले आहे.

सोबतच त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांवर तिखट शब्दांत निशाणा देखील साधला आहे. ” खंत एवढीच..महाराष्ट्र शासनाने अथवा मुख्यमंत्र्यांनी,अस्मितेचे धडे देणाऱ्या पत्रपंडितानी ना  योगी आदित्यनाथ याचे अभिनंदन केले… ना या निर्णयाची साधी दखल घेतली! तशी अपेक्षा करणे चुकीचे म्हणा..इथे छत्रपतींच्या वंशजाकडे पुरावे मागितले जातात,तिथे अपेक्षा काय करावी? ” असा घणाघात आमदार ऍड. आशिष शेलार यांनी केला आहे.

दरम्यान याआधी योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण ‘अयोध्या’ असं केलं होतं. मुघलसराय जंक्शनचे नामकरण ‘पंडित दिनदयाल उपाध्याय जंक्शन’ तर अलाहाबाद शहारचं नाव ‘प्रयागराज’ असं केलेलं आहे. आता अलिगढ जिल्ह्याचे नावसुद्धा बदलावं अशी मागणी होत आहेत. आता त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या :-