मुंबई : काही दिवसांपासून बँकिंगचा ट्रेंड वाढत चालला असून त्यासोबत सायबर गुन्ह्यातही वाढ होत असल्याचे दिसत आहे. नुकतंच अभिनेता राजकुमार रावच्या (Actor Rajkumar Rao) नावाचा बनावट ईमेल आयडी (fake email ID) बनवून पैशांची मागणी केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. याबाबत राजकुमार रावने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बनावट ईमेलचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे.
दरम्यान राजकुमार राव याने या बनावट ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात एक विशिष्ट मेल लिहिलेला दिसत आहे. ‘हाय अर्जुन, माझी मॅनेजर सौम्या आणि तुमच्या शेवटच्या संभाषणानंतर मी ‘हनीमून पॅकेज’ या उल्लेख केलेला चित्रपट करण्यासाठी तयार आहे. हा चित्रपट संतोष मस्के (Santosh Muske) यांनी लिहिला असून तो ते दिग्दर्शितही करत आहे. मी सध्या प्रत्यक्ष मुंबईत उपस्थित नसल्यामुळे ईमेलद्वारे माझी चित्रपटासाठी संमती पाठवत आहे.
या चित्रपटावर स्वाक्षरी करण्याची प्रक्रिया, स्क्रिप्टचे वाचन करणे आणि कराराच्या हार्ड कॉपीचे काम मी मुंबईत आल्यावर केले जाईल. हा करार तेव्हाच विचारात घेतला जाईल जेव्हा करारावर स्वाक्षरी केलेली ३ कोटी १० लाख रुपये (एकूण शुल्काच्या ५० टक्के) रक्कम माझ्या बँक खात्यात जमा केली जाईल. किंवा माझ्या व्यवस्थापकाने नमूद केल्यानुसार तुम्ही १० लाख रुपये रोख आणि ३ कोटी चेकद्वारे देत आहात. मी येत्या ६ जानेवारी रोजी हैदराबाद रामोजी स्टुडिओमध्ये (Hyderabad Ramoji Studio) चित्रपटाची कथा ऐकण्यासाठी येत आहे. त्यामुळे तुम्ही दिग्दर्शक आणि निर्माते यांना सर्व मेलसह येथे आमंत्रित करावे, राजकुमार राव असे या मेलमध्ये लिहिण्यात आले आहे.
दरम्यान या बनावट मेलचा स्क्रीन शॉट शेअर करत राजकुमार रावने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. #FAKE कृपया अशा बनावट लोकांपासून सावध रहा. सौम्या नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. हे लोक बनावट ईमेल आयडीचा वापरून लोकांना मूर्ख बनवत आहेत, असे सांगत त्याने चाहत्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “पत्रकारांवर खटले दाखल करून, त्यांना अटक करणाऱ्या सूडबुद्धी ठाकरे सरकारचे डोके ठिकाणावर येवो”
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण
- भाजप नेते राम सातपुते कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- ‘पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’, भातखळकरांची मागणी
- ‘दर्पण’ वृत्तपत्राच्या माध्यमातून जांभेकरांनी राष्ट्रभक्ती व समाजसेवेचे बीज महाराष्ट्रात रुजवले- चंद्रकांत पाटील
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<