fbpx

आधी बँकांना विचारा आणि मग ठरवा कोण चोर आहे : विजय माल्या

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय बँकांना जवळपास ९ हजार कोटी रुपयांचा चुना लाऊन फरार झालेल्या विजय माल्याने नुकतीच क्रिकेटपटू क्रिस गेलची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्याने एक ट्वीट करून आधी तुमच्या बँकांना विचारा आणि मग चोर कोण आहे ते ठरवा अस म्हटले आहे.

या भेटीनंतर भेटीनंतर क्रिस गेलने एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केला होता. या फोटोला रीट्वीत करत माल्याने ‘गेल्या वर्षभरापासून आपण भारतीय बँकेला पैसे देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु बँकच पैसे घेत नसल्याचा दावा मल्ल्याने केला आहे. यासोबतच त्याने आपल्या ट्विटमध्ये ‘मला चोर बोलणाऱ्यांनो आधी तुमच्या बँकला विचारा आणि मग चोर कोण ते ठरवा’, असे म्हटले आहे.