Share

T20 World Cup |  “रोहितला लोखंडी शूज बनवायला सांगा” ; आफ्रिदीची घातक गोलंदाजी, नेटकऱ्यांकडून मीम्सचा वर्षाव

T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान संघाचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीने सर्व संघांसाठी धोक्याची घंटी वाजवली आहे. शाहीन्य दुखापती नंतर पुनरागमन करून सराव सामन्यांमध्ये घातक गोलंदाजी करत इतर टीम्सना धोक्याचा इशारा दिला आहे. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न मध्ये पाकिस्तानला विश्वचषकातील पहिला सामना भारत विरुद्ध खेळायचा आहे.

विश्वचषकापूर्वी सराव सामन्यांमध्ये बुधवारी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान आपला दुसरा सराव सामना खेळत होते. दरम्यान शाहीन आफ्रिदीने पहिल्या शतकात प्राणघातक गोलंदाजी करून आपला घातक अंदाज दाखवून दिला. सामना दरम्यान शाहीनने अचूक यॉर्कर टाकल्यामुळे अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली. या सामन्यात अफगाणिस्तान टॉस हरवून प्रथम फलंदाजी करत होते. दरम्यान, आफ्रिदीने आपले पहिले षटक टाकले आणि पहिल्या षटकातील पाचव्या यॉर्करने त्याने अफगाणिस्तानच्या खेळाडूला जखमी केले. आफरीने वेगवान यॉर्कर टाकताच तो थेट अफगाणिस्तानच्या खेळाडूच्या पायाच्या बोटाला येऊन लागला. चेंडू लागतात गुरबाज वेदनेने ओरडू लागला आणि त्याचवेळी अंपायरने त्याला LBW आऊट केले.

पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी याची खेळी पाहता, त्याचे चाहते सोशल मीडियावर खूप आनंदी दिसत असून आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान सोशल मीडियावर याबद्दल काही मीन्स देखील व्हायरल होत आहे. या मीन्समध्ये नेटकऱ्यांनी भारतीय संघाचा कर्णधार आणि भारतीय संघातील खेळाडूंना धारेवर धरले आहे.

एका नेटकऱ्याने ट्विट करत लिहिले आहे, ” रोहित शर्माला लोखंडी शूज बनवायला सांगा.” तर दुसरीकडे दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ” भीती वाटत आहे का? “. सध्या हे मीन्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून शाहीरने आपल्या पुनरागमनाने सर्व खेळाडूंमध्ये आपली दहशत निर्माण केली आहे.

https://twitter.com/HARSHAL17371828/status/1582595372295524352?s=20&t=ieMlM70MtQp9l7Oklf89Ug

T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान संघाचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीने सर्व संघांसाठी धोक्याची घंटी वाजवली …

पुढे वाचा

Cricket Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now