महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा मोदींना लस देण्यास सांगा, सचिन सावंत यांची जावडेकरांवर टीका

मुंबई : लस उपलब्ध नसल्याने राज्यातील अनेक लसीकरण केंद्रावर लसीकरण थांबवण्यात आले आहे. तर काही केंद्रावर कमी लस उपलब्ध असल्याने अनेकांना लस मिळत नाही. अशा परिस्थितीत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा मोदींना लस देण्यास सांगा, असे सावंत यांनी म्हटले आहे.

या संदर्भात सावंत यांनी प्रकाश जावडेकरांनी या आधी केलेल्या टीकेचा उल्लेख केलाय. सोशल मीडियावर टीका करतांना सावंत म्हणाले की, ‘प्रकाश जावडेकरजी, महाराष्ट्रातील लशींचा अपव्यय ०.२२% आहे, तुमच्या खोटेपणानुसार ६% नाही. मोदी सरकारच्याच माहितीने तुमचा खोटारडेपणा उघड झाला. आम्हाला आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे ज्यांनी लसीकरणात महाराष्ट्राला १ल्या क्रमांकाचे राज्य बनवले व लशींचा कमीतकमी अपव्यय ठेवला
दु:ख याचे वाटते की महाराष्ट्र भाजपचे तुमच्यासारखे नेते राजकारणासाठी महाराष्ट्राचा अपमान व निंदा करीत आहात.
गंभीर बाब – महाराष्ट्रात फक्त २३५४७ लशी शिल्लक आहेत. मोदीजी वेळेवर लशी देत नसतील तर आम्ही जनतेची सेवा कशी करावी?’

लस उपलब्धतेवरुन महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात कायमच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता लस उत्पादक करणाऱ्या कंपन्यांची मर्यादा पाहता लवकर लस उपलब्ध होण्याची शक्यताही कमीच आहे. त्यामुळे आणखी काही महिने मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या