Share

Asim Sarode | “शाईफेक प्रकरणी अटक केलेल्या आरोपींचा खटला मोफत चालवणार”; असीम सरोदे यांची घोषणा

Asim Sarode | मुंबई : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केलं. त्यानंतर त्यांनी माफी मागितली. तरीही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून त्यांचा निषेध करण्यात आला. शाई फेकल्या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तिघांना अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मनोज भास्कर घरबडे (समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज ( समता सैनिक दल सदस्य) आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ या तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. त्यांच्यावर भादवि कलम 307 ,353, 294, 500, 501, 120 (ब) 34 क्रिमिनल अमेंन्डमेंन्ट ऍक्ट कलम 7 “महाराष्ट्र” महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37(1) आणि 135 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील असिम सरोदे (Asim Sarode) यांनीही या प्रकरणी ट्वीट करत मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “शाईफेक प्रकरणात कलम ३०७ म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि १२० ब, शस्त्रास्त्र कायद्याचा वापर करणे यानुसार गुन्हा दाखल करणे अतिरेकीपणा आहे”, असं मत त्यांनी मांडलं.

 

“यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे. त्यामुळे आमची कायदेशीर टीम आरोपींची केस मोफत चालवेल. परंतु, शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध,” असंही असीम सरोदे यांनी नमूद केलं.

“कुणावर तरी शाई फेकणे, बूट किंवा चप्पल मारून फेकणे हा राग व्यक्त करण्याचा,इन्स्टंट न्याय हवा असण्याचा प्रकार लोकशाहीत बसत नाही.चंद्रकांत दादांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण त्यांनी ज्या प्रकारे स्वतःचे मत मांडले तो अभिव्यक्तीचा गैरवापर व चुकीची अभिव्यक्ती आहे, ते गौरवर्तन आहे”, असंही ते म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

Asim Sarode | मुंबई : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केलं. त्यानंतर त्यांनी माफी मागितली. तरीही …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics