fbpx

माणुसकीचा पराभव ; आसिफाच्या कुटुंबाने गाव सोडले !

असिफा

टीम महाराष्ट्र देशा : देशाला हादरवून सोडणाऱ्या काश्मीर खोऱ्यातील कठुआ जिल्ह्यातील आसिफा या आठ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेवरून आता राजकारण सुरू झालं आहे. मात्र या राजकारणामुळे घाबरलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी गावं सोडल्याचं वृत्त हाती येत आहे.

आसिफा ही बकरवाल या भटक्या मुस्लिम जमातीतील चिमुकली. तिच्या हत्येच्या घटनेला गोहत्येशी जोडले जात असून जम्मू आणि काश्मीर या विभागांतील अंतर्गत धुसफूसही यानिमित्त उघड होत आहे. या घटनेच्या विरोधात एकीकडे निदर्शने होत आहेत, दुसरीकडे आरोपींच्या समर्थनार्थही जमाव रस्त्यावर येत आहेत.