१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात, भारतातून ५७२ खेळाडू दाखल

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर भारतीय खेळाडू आता सज्ज झाले ते म्हणजे 18 वी एशियाड स्पर्धा खेळण्यासाठी १८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात होणार आहे. इंडोनेशियाच्या जकार्ता येथे या स्पर्धेचा सोहळा रंगणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज संध्याकाळी पार पडेल. या स्पर्धेत कुस्ती, बॅडमिंटन, नेमबाजी यासारख्या प्रमुख खेळांमधून भारताला पदकाची आशा आहे. भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी नुकताच स्पर्धेचा ड्रॉ जाहीर करण्यात आला आहे. भारतीय महिलांना या स्पर्धेत खडतर आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. मात्र तुलनेत पुरुष खेळाडूंना सोपं आव्हान असणार आहे असं अंदाज वर्तवला जात आहे.

पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल यासारख्या खेळाडूंना पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आल्यामुले भारतीय खेळाड उपांत्यपूर्व सामन्यात खेळणार आहेत. या सामन्यात भारतीय महिलांना जपानचं तगडं आव्हान मिळणार आहे. अकाने नामागुची, नोझुमी ओकुहारा यासारख्या मातब्बर खेळाडू भारतीय खेळाडूंसमोर उभ्या ठाकण्याची शक्यता आहे.

मागील काही वर्षांत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी विविध आंतरराष्ट्रीय, जागतिक स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. त्यात सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत, अजय जयराम, एच एस प्रणॉय यांचे प्रामुख्याने नाव घ्यायला हवे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीयांनी 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य अशा एकूण 66 पदकांची कमाई केली होती. यात बॅडमिंटनचा वाटा 6 पदकांचा ( 2 सुवर्ण, 3 रौप्य व 1 कांस्य) होता. त्यात विशेष म्हणजे पाच खेळाडूंनी सुवर्णपदकाच्या शर्यतीपर्यंत मजल मारली. त्यामुळे आशियाई स्पर्धेतही भारतीयांकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.

पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्याने भारतीय महिला संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे त्यांना पदक निश्चित करण्यासाठी केवळ एक सामना जिंकावा लागणार आहे. पण, हा सामना जिंकण्यासाठी त्यांना बलाढ्य जपानचा सामना करावा लागणार आहे. 2014मध्ये भारत आणि जपान महिला संघांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उभय संघ समोरासमोर येतील ते 2014च्या कामगिरीपेक्षा चांगली कामगिरी करण्याच्या निर्धारानेच.

20 वर्षांच्या हिमाने जागतिक अॅथएलेटीक्स स्पर्धेत सुवर्णपदकाला घातली गवसणी

शेतक-यांनासुध्दा तुम्ही सोडत नाही. कुठे फेडाल हे पाप? -अनिल गोटे