‘आशिया कप’चा थरार आजपासून,भारत-पाक लढतीकडे नजरा

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली असली तरी भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत नेहमीच क्रिकेटरसिकांसाठी खास पर्वणी राहिली आहे. याच पाश्र्वभूमीवर शनिवारपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. सहा देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचा प्रारंभ बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे.

Loading...

कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ नेमकी कामगिरी कशी करतो, हे या स्पर्धेत पाहायला मिळेल. इंग्लंड दौऱ्यानंतर विराटला विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा संघ दर्जेदार आहे. मोहम्मद आमिर, अष्टपैलू हसन अली, सलामीवीर फखर झमान, बाबर आझम, हारिस सोहेल असे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. भारताचे उद्दिष्ट हे स्थिरस्थावर मधली फळी असेल.

सलामी हाँगकाँगशी
भारताचा सलामीचा सामना 18 सप्टेंबर रोजी हाँगहाँग संघाशी होणार असून दुसऱयाच दिवशी भारत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडेल. इंग्लंड दौऱयातील पराभवाच्या कटू आठवणी पुसण्याच्या आणि विजेतेपद राखण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...