मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल आशिया कप २०२२ मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेसाठी केएल राहुलला कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र मालिका सुरू होण्याअगोदरच तो दुखापतीमुळे संघाबाहेर पडला होता. त्यानंतर ऋषभ पंतला संघाचा कर्णधार बनवण्यात आले. या मालिकेतील पहिले २ सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाने मालिकेत पुनरागमन करत पुढील दोन सामने जिंकले. शेवटचा निर्णायक सामना पावसामुळे रद्द झाला आणि मालिका २-२ अशी बरोबरीत संपली.
राहुल आशिया चषकातून बाहेर पडण्याची शक्यता
आशियाई क्रिकेट परिषदेची (ACC) १९ मार्च रोजी बैठक झाली होती. या बैठकीत आशिया चषक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान श्रीलंकेत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर आशिया चषकाची तारीख बदलून २४ ऑगस्ट ७ सप्टेंबर करण्यात आली होती. इएसपीएन क्रिकइन्फो मधील अहवालानुसार, स्पोर्ट्स हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर खेळाडूला बरे होण्यासाठी ६ ते १२ आठवडे लागतात. त्यानुसार राहुल आशिया चषकासाठी उपलब्ध नसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राहुल थेरपीसाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणार आहे. राहुलने नुकताच ट्विटरवर शस्त्रक्रियेनंतरचा फोटो पोस्ट केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये ‘रोड टू रिकव्हरी’ असे लिहिले आहे. केएल राहुल शस्त्रक्रियेसाठी जर्मनीला गेला असून तेथे त्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. चाहत्यांना आशा आहे की, राहुल लवकरच तंदुरुस्त होईल आणि पुन्हा मैदानात दिसेल. आशिया चषक स्पर्धेत राहुलच्या सहभागाची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या :
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<